मुंबई
मराठ्यांचं आंदोलन मुंबईत धडकणार की नवी मुंबईतच थांबणार असा सवाल उपस्थित झाला आहे. मुंबईतील आझाद मैदान इतक्या मोठ्या जमावासाठी पुरेसा नाही. त्यामुळे जरांगे पाटलांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. जरांगे पाटील काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मराठ्यांच्या आंदोलनाबरोबर ओबीसी समाजानेही चलो मुंबईची हाक दिली आहे. आझाद मैदानात ५ हजारांना जमाव आंदोलन करू शकतो. दोन्ही समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी जरांगे पाटलांना नोटीस बजावली आहे.
लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहे. सरकारचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगेशी चर्चा करण्यासाठी तेथे पोहोचलं होतं. एका बंद खोलीत त्यांची चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे यांच्याशी ऑनलाइन संवाद साधण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. लवकरच मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळवून देऊ असाही विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात 20 जानेवारी 2024 पासून सुरु झालेल्या पायी आरक्षण दिंडीचा मुक्काम आज 25 जानेवारी 2024 रोजी नवी मुंबई शहरातील APMC मार्केटमध्ये करण्यात आला असून येथेच राहण्याची, खाण्याची आणि झोपण्याची, नाश्त्याची, अंघोळीची, शौचालय आणि पार्किंगची सोय करण्यात आली आहे.