नगरपरिषदेच्या उत्पन्नातील तूट शासनाकडून भरून काढण्याचा मंत्री अदिती तटकरे यांचा शब्द**
महाड – नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा गाठताना महाडमध्ये राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी केलेली मोठी घोषणा चर्चेत आली आहे. महाड शहरातील घरपट्टी निम्मी करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला असून ही घोषणा निवडणुकीत ‘गेम चेंजर’ ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
महत्वाचे म्हणजे, घरपट्टी कमी झाल्याने नगरपरिषदेच्या उत्पन्नात निर्माण होणारी तूट शासन भरून काढेल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
महाडमध्ये घेतलेल्या एनसीपी-बीजेपी संयुक्त पत्रकार परिषदेत अदिती तटकरे म्हणाल्या, “राजकीय मतभेद असले तरी आम्ही महायुतीचा भाग आहोत. मी कोणाच्याही मतदारसंघात हस्तक्षेप करत नाही. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आणि एकनाथ शिंदे या तिन्ही नेत्यांचे मला पहिल्या मंत्रीपदापासून सातत्याने सहकार्य मिळाले.”
त्या पुढे म्हणाल्या की, एकमेकांवर टीका करून फायदा होत नाही; लोकांना मूलभूत सुविधा आणि विकास महत्त्वाचा वाटतो.

