शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे विधान परिषदेत रमाई आवास योजनेतील कथित बनावट कागदपत्रांचा मुद्दा उपस्थित करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

रमाई आवास योजनेत बनावट कागदपत्रांचा आरोप; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचा वापर झाल्याचा दावा विधान परिषदेत

मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील रमाई आवास योजनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावांचा वापर करून कथित बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप बुधवारी विधान परिषदेत करण्यात आला. शिवसेना (ठाकरे गट)चे गटनेते अंबादास दानवे यांनी नियम ९३ अंतर्गत हा मुद्दा उपस्थित करत सरकारकडे सखोल चौकशीची मागणी केली. दानवे यांनी सभागृहाच्या पटलावर काही कथित कागदपत्रे ठेवत मुख्यमंत्री […]

भाजप गटनेते प्रवीण दरेकर विधान परिषदेत आमदारांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहन चालकांच्या मानधनवाढीची मागणी मांडताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

आमदारांच्या स्वीय सहाय्यक-चालकांच्या मानधनवाढीला गती?; विधान परिषदेत प्रवीण दरेकरांची सरकारकडे जोरदार मागणी

मुंबई : महागाईच्या पार्श्वभूमीवर आमदारांचे स्वीय सहाय्यक आणि वाहन चालक यांच्या रखडलेल्या मानधनवाढीचा मुद्दा बुधवारी विधान परिषदेत पुन्हा ऐरणीवर आला. भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे हा प्रश्न उपस्थित करत संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. सध्या आमदारांच्या स्वीय सहाय्यकांना दरमहा ३० हजार रुपये, तर वाहन चालकांना २० हजार रुपये मानधन दिले जाते. वाढत्या महागाईच्या […]

विधान परिषदेत गरीब रुग्णांसाठी राखीव खाटा आणि पंचतारांकित रुग्णालयांवरील कारवाईचा मुद्दा उपस्थित करताना आमदार चित्रा वाघ. मुंबई ताज्या बातम्या

गरीब रुग्णांना राखीव खाटा नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई होणार? विधान परिषदेत चित्रा वाघ यांचा सवाल 

मुंबई: मुंबईतील पंचतारांकित रुग्णालयांनी शासकीय सवलतींचा लाभ घेत असूनही गरीब रुग्णांसाठी राखीव खाटा उपलब्ध करून देण्याच्या अटींचे पालन होत नसल्याचा मुद्दा भाजप आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. नियमभंग करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. चित्रा वाघ यांनी शासनाला दोन प्रमुख प्रश्न उपस्थित केले. महापालिकेकडून सवलतीच्या दरात जमीन, एफएसआय आणि इतर […]