कल्पक डिजिटल मीडिया एलएलपी (Kalpak Digital Media LLP) चे प्रकाशन
राजकारण (The Rajkaran) हे महाराष्ट्राच्या राजकारणावर केंद्रित असलेले मराठी डिजिटल वृत्त व विश्लेषण व्यासपीठ आहे. राज्यातील राजकीय घडामोडी, प्रशासन, धोरणात्मक निर्णय, निवडणुका आणि सार्वजनिक उत्तरदायित्व याबाबत वस्तुनिष्ठ व सखोल माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे.
महाराष्ट्रातील राजकारण व पक्षीय घडामोडी
शासन, प्रशासन आणि धोरणांचे परिणाम
विधानसभा व विधानपरिषदेतील घडामोडी
महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत राज संस्थांचे राजकारण
राजकीय विश्लेषण, स्पष्टीकरणात्मक लेख आणि पुराव्याधारित तपासणी (तथ्यांच्या आधारे)
तथ्यांवर आधारित पत्रकारिता: अधिकृत कागदपत्रे, सार्वजनिक नोंदी, प्रत्यक्ष बातमीदारी आणि विश्वासार्ह स्रोतांवर आधारित मजकूर.
उत्तर देण्याचा हक्क: एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेबाबत बातमी असल्यास त्यांची बाजू जाणून घेण्याचा व प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न.
दुरुस्तीची पारदर्शकता: चूक लक्षात आल्यास ती तात्काळ आणि स्पष्टपणे दुरुस्त करणे.
राजकीय दबावमुक्तता: कोणत्याही राजकीय पक्ष, गट किंवा व्यक्तीकडून आर्थिक किंवा अन्य प्रभाव स्वीकारला जात नाही.
राजकारण (The Rajkaran) हे Kalpak Digital Media LLP या संस्थेद्वारे चालवले जाते. या समूहाअंतर्गत खालील डिजिटल माध्यमे कार्यरत आहेत:
TheNews21.com (इंग्रजी) – तपासात्मक व प्रशासन-केंद्रित पत्रकारिता
Maharashtra.city (मराठी/हायब्रिड) – नागरी व शहरकेंद्रित बातम्या (पुनरुज्जीवन नियोजित)
TheRajkaran.com (मराठी) – महाराष्ट्राचे राजकारण, प्रशासन व निवडणुका
राजकारणात रस नाही अशी व्यक्ती शोधून सापडणे कठीण आहे.
राजकारण आवडत नाही असे म्हणणारी व्यक्तीही, कधी विरोधात तर कधी समर्थनात, राजकारणावर मनापासून बोलत असते. गावखेड्यांत पारावर बसून देश कसा चालवायचा, राज्याचा कारभार कसा हाकायचा, यावर चर्चा करणारे असंख्य नागरिक आपल्याला आजही आढळतात.
थोडक्यात सांगायचे झाले तर — आपल्याला आवडो वा नावडो, राजकारण हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचे झाले, तर गेल्या काही वर्षांत राज्याच्या राजकारणात इतक्या वेगाने आणि अनपेक्षित उलथापालथी घडल्या आहेत की त्यांचा अंदाज लावणेही अवघड झाले आहे. पुढे काय घडेल, याविषयी ठाम भाकीत करणे कठीण असले तरी, प्रत्येक घडामोडीमागे एक विशिष्ट राजकीय गणित कार्यरत असते, हे नक्की.
बरंच काही पडद्यामागे घडत असतं. अनेक निर्णय, हालचाली आणि बदल हे केवळ बातम्यांच्या मथळ्यांतून समजत नाहीत. त्या घडामोडींच्या ‘ओळींच्या मधला अर्थ’ (between the lines) शोधणे, संदर्भ लावणे आणि त्यांचे सखोल विश्लेषण करणे—हेच राजकारणचे उद्दिष्ट आहे.
राजकारण मध्ये केवळ बातम्यांची मांडणी नसेल, तर त्या बातम्यांमागचा अर्थ, त्यांचे राजकीय परिणाम, विश्लेषणात्मक लेख आणि वाचकांना विचार मांडण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठही असेल.
म्हणूनच, वाचकांनो—
सामील व्हा, विचार मांडाः चर्चा करूया, प्रश्न विचारूया आणि राजकारण समजून घेऊया.
सूचना, दुरुस्ती, बातमीविषयक माहिती किंवा उत्तर देण्याचा हक्क (Right to Reply) यासाठी:
ई-मेल: therajkaran2023@gmail.com