Vivek Bhavsar

Founder

गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेत असलेले विवेक भावसार (Vivek Bhavsar) हे कल्पक डिजिटल मीडिया एल एल पी (Kalpak Digital Media LLP) या माध्यम समुहाचे समूह संपादक आहेत. विवेक भावसार यांनी मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रात राजकीय आणि शोध पत्रकारिता केली आहे.  संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खान्देशात पुढाकार घेतलेल्या  धुळे येथील दैनिक आपला महाराष्ट्र या वृत्तपत्रातून  त्यांनी १९९३ मध्ये पूर्णवेळ […]

गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेत असलेले विवेक भावसार (Vivek Bhavsar) हे कल्पक डिजिटल मीडिया एल एल पी (Kalpak Digital Media LLP) या माध्यम समुहाचे समूह संपादक आहेत. विवेक भावसार यांनी मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रात राजकीय आणि शोध पत्रकारिता केली आहे.  संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खान्देशात पुढाकार घेतलेल्या  धुळे येथील दैनिक आपला महाराष्ट्र या वृत्तपत्रातून  त्यांनी १९९३ मध्ये पूर्णवेळ पत्रकारितेला सुरुवात केली. मुंबईत आल्यावर त्यांनी लोकमत, सामना या मराठी वृत्तपत्रासह The Asian Age आणि Free Press Journal या इंग्रजी वृत्तपत्रांत काम केले. सन १९९३ च्या आधी १९८८ पासून ते लोकमत, गावकरी व अन्य मासिकात स्फुट लेखन करत होते. त्यांनी समृद्धी महामार्ग जमीन संपादनातील अनियमितता, तूर डाळ खरेदी घोटाळा, कोळसा खाण घोटाळा उघडकीस आणला. कोकणातील नाणार या तेल शुद्धीकरण प्रकल्प परिसरातील  शेतकऱ्यांच्या जमिनी धनदांडग्या गुंतवणूकदारांकडून अल्प मोबदल्यात खरेदी करून शेतकऱ्यांची झालेली फसवणूक  विवेक भावसार यांनी  सर्वप्रथम उघडकीस आणल्याने सरकारला हा प्रकल्पच रद्द करावा लागला होता.

TheNews21 (https://thenews21.com) हे Kalpak Digital Media LLP चे पहिले English News Portal, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि भारतीय राजकारण यावर विश्लेषण करणाऱ्या या पोर्टल साठी भारतासह श्रीलंका, रशिया, पश्चिम आशियाई देश, सिंगापूर, तैवान, नेदारलँड्स आणि अमेरिका येथील मुक्त पत्रकार लेखन करतात. हे पोर्टल सप्टेंबर 2019 पासून कार्यरत आहे.  त्यानंतर मनोरंजन, क्रीडा, गुन्हे यासारख्या सर्व विषयांना स्पर्श करणारे www.maharashtra. city हे मराठी  पोर्टल मे 2021 मध्ये सुरू करण्यात आले तर राजकारण (https://therajkaran.com) हे पूर्णपणे राजकीय बातम्या आणि विश्लेषण याला वाहिलेले तिसरे मराठी पोर्टल ऑगस्ट 2023 मध्ये सुरू करण्यात आले.