गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेत असलेले विवेक भावसार (Vivek Bhavsar) हे कल्पक डिजिटल मीडिया एल एल पी (Kalpak Digital Media LLP) या माध्यम समुहाचे समूह संपादक आहेत. विवेक भावसार यांनी मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रात राजकीय आणि शोध पत्रकारिता केली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खान्देशात पुढाकार घेतलेल्या धुळे येथील दैनिक आपला महाराष्ट्र या वृत्तपत्रातून त्यांनी १९९३ मध्ये पूर्णवेळ […]
गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेत असलेले विवेक भावसार (Vivek Bhavsar) हे कल्पक डिजिटल मीडिया एल एल पी (Kalpak Digital Media LLP) या माध्यम समुहाचे समूह संपादक आहेत. विवेक भावसार यांनी मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रात राजकीय आणि शोध पत्रकारिता केली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खान्देशात पुढाकार घेतलेल्या धुळे येथील दैनिक आपला महाराष्ट्र या वृत्तपत्रातून त्यांनी १९९३ मध्ये पूर्णवेळ पत्रकारितेला सुरुवात केली. मुंबईत आल्यावर त्यांनी लोकमत, सामना या मराठी वृत्तपत्रासह The Asian Age आणि Free Press Journal या इंग्रजी वृत्तपत्रांत काम केले. सन १९९३ च्या आधी १९८८ पासून ते लोकमत, गावकरी व अन्य मासिकात स्फुट लेखन करत होते. त्यांनी समृद्धी महामार्ग जमीन संपादनातील अनियमितता, तूर डाळ खरेदी घोटाळा, कोळसा खाण घोटाळा उघडकीस आणला. कोकणातील नाणार या तेल शुद्धीकरण प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी धनदांडग्या गुंतवणूकदारांकडून अल्प मोबदल्यात खरेदी करून शेतकऱ्यांची झालेली फसवणूक विवेक भावसार यांनी सर्वप्रथम उघडकीस आणल्याने सरकारला हा प्रकल्पच रद्द करावा लागला होता.