महाराष्ट्रातील शेतकरी, शेती आणि कर्जमाफी योजनेचे प्रतीकात्मक छायाचित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्राची नवीन शेतकरी कर्जमाफी योजना मंजूर; दोन लाखांपर्यंत कर्जमाफी, पण ग्रामीण संकटावर कायमस्वरूपी उपाय ठरणार?

मुंबई : राज्यातील वाढत्या कृषी कर्जबाजारीपणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंगळवारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ मंजूर करत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कर्जमाफीबरोबरच मोठ्या थकबाकीदारांसाठी ‘वन टाईम सेटलमेंट’ योजना आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदानाचाही समावेश करण्यात आला आहे. […]