नवी मुंबईतील १२ हजार अनधिकृत बांधकामांवर सुनावणी; पात्र प्रकरणांच्या नियमितीकरणाचे सरकारचे संकेत
मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १२ हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामांबाबत सुरू असलेल्या कारवाईदरम्यान नियमात बसणाऱ्या प्रकरणांच्या नियमितीकरणाचा पर्याय सरकार विचाराधीन असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. मिसाळ यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण सुरू आहे. या मोहिमेत आतापर्यंत १२,६८७ बांधकामधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यापैकी २,३६२ प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली आहे. उर्वरित […]
