पुण्यातील येवलेवाडी येथील निसर्गग्रामचा विस्तृत परिसर महाराष्ट्र ताज्या बातम्या

निसर्गाच्या सान्निध्यात आरोग्याचा नवा विचार; पुण्यात साकारले ‘निसर्गग्राम’!

पुण्यातील ताडीवाला रोडवर राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थेचे जुने केंद्र आहे. एकेकाळी तिथे उपचार घेतले आणि तेव्हापासून निसर्गोपचाराविषयी माझ्या मनात विशेष आस्था निर्माण झाली. कधी तरी उरुळी कांचनच्या निसर्गोपचार केंद्रात पंधरा दिवस राहून उपचार घ्यावेत, असेही वाटायचे. मात्र वेळेच्या गणितात ते कधी जमले नाही. अनेक परिचितांना या केंद्राची माहिती देऊन तिथे उपचारासाठी पाठविलेही आहे. त्यामुळेच २०२४ मध्ये […]