महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या दिशेने पाऊल; माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
मुंबई : महाराष्ट्रात समान नागरी कायदा (Uniform Civil Code – UCC) लागू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली. या समितीत माजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण, एस. जी. मेहरे, माजी मुख्य सचिव डी. के. जैन, माजी अॅडव्होकेट जनरल बिरेन्द्र सराफ, पद्मश्री रमेश […]
