‘वर्षा’वरील भेटीमागचे गूढ अखेर उलगडले; महायुती प्रवेशाच्या चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम
ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या प्रकरणासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट; पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही, स्पष्ट भूमिका मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात सुरू झालेल्या विविध तर्क-वितर्कांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी बुधवारी स्पष्ट उत्तर दिले. ही भेट महायुतीत प्रवेश, मंत्रिपद किंवा पक्ष विलीनीकरणासाठी नसून, सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या […]
