विनोद तावडे-एकनाथ खडसे भेटीने रंगल्या राजकीय चर्चा; उत्तर महाराष्ट्रात नव्या समीकरणांची चर्चा
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. या भेटीचा अधिकृत तपशील समोर आलेला नसला, तरी उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांच्या संदर्भात या भेटीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. लोकसभा निवडणुकीपासून एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील संभाव्य पुनरागमनाबाबत अधूनमधून चर्चा होत आहे. दिल्लीतील […]
