३८ वर्षांनंतर कृषी विभागाला नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य…!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ घोषवाक्याचे अनावरण मुंबई — राज्याच्या कृषी विभागाला तब्बल ३८ वर्षांनंतर नवी ओळख मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे आणि ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ या नवीन घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले.या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे प्रमुख उपस्थित होते. […]
