दादर स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’ होणार? आगामी अधिवेशनात नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची ग्वाही…!
राज्य सरकारची यापूर्वीच तत्त्वतः मान्यता; केंद्राच्या मार्गदर्शनानुसार विधिमंडळातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापरिनिर्वाण दिनासाठी १५ लाख अनुयायांच्या संभाव्य गर्दीचे नियोजन; इंदू मिल स्मारकाच्या उर्वरित कामासाठी अतिरिक्त निधीची हमी…! मुंबई— भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण स्थळाच्या सन्मानार्थ दादर रेल्वे स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’ करण्याच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला आता पुढील प्रशासकीय दिशा मिळण्याची […]
