Elections: सत्ताधारी महायुती सरकारच्या नेत्यांना निवडणूक आयोगाचा दणका!
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक प्रचारादरम्यान आचारसंहिता लागू असतानाही महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी “लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट दोन हप्त्यांचे ३ हजार रुपये जमा होणार” अशा घोषणा सत्ताधारी नेत्यांकडून केल्या जात होत्या. मात्र, अखेर राज्य निवडणूक आयोगाने या प्रचाराला जोरदार दणका दिला आहे. या कारवाईमुळे महायुतीच्या नेत्यांनी पाहिलेल्या मतांच्या स्वप्नांवर पाणी फिरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात […]
