आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करा – राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेतून सूट देण्यासाठी येणाऱ्या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी राज्य सरकारला दिले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात ज्या पद्धतीने समिती स्थापन केली जाते, त्याच धर्तीवर ही समिती स्थापन करण्याची शिफारस आयोगाने केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश […]
