महाराष्ट्र ताज्या बातम्या

बोगस जन्म–मृत्यू दाखले रद्द करा : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सक्त आदेश

मुंबई — राज्यात बेकायदेशीररीत्या आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जन्म–मृत्यू दाखल्यांच्या रॅकेटवर गंडांतर आणण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. केवळ आधारकार्डच्या आधारे दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे सर्व जन्म–मृत्यू दाखले तात्काळ रद्द करा, तसेच संबंधितांवर पोलिसात त्वरित तक्रार दाखल करा, असे कडक आदेश त्यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले. महसूल विभागाने यासंबंधीचे परिपत्रक आज जारी […]