Assembly Session: मुंबईला ‘पागडीमुक्त’ करण्यासाठी सरकारचा ऐतिहासिक निर्णय; स्वतंत्र नियमावली येणार — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत मोठी घोषणा
नागपूर – मुंबईला पागडीमुक्त करण्यासाठी आणि पागडी इमारतींचा न्याय्य, सुयोग्य आणि जलद पुनर्विकास करण्यासाठी शासन स्वतंत्र नियमावली तयार करत असल्याची ऐतिहासिक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. “भाडेकरू आणि घरमालक — दोघांच्याही हक्कांचे संरक्षण केले जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांनी सांगितले, मुंबईतील सुमारे १९,०००+ सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात. […]
