राज्यातील महामार्गांवर अपघातानंतर आता ‘एअर लिफ्ट’ची तयारी…!
मुंबई — राज्यातील प्रमुख महामार्गांवर होणाऱ्या भीषण अपघातांनंतर गंभीर जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. या सेवेसाठी समृद्धी महामार्ग, मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई–गोवा महामार्गाला प्राधान्य देण्यात येणार असून, नववर्षाच्या सुरुवातीला सेवा कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी […]
