कामात दिरंगाई किंवा तक्रार आल्यास गय नाही; आरोग्यमंत्री Prakash Abitkar यांचा अधिकाऱ्यांना इशारा
मुंबई : राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात आरोग्य विभागाच्या प्रलंबित बांधकामांचा आढावा घेतला. बैठकीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना कामातील दिरंगाई आणि निष्काळजीपणाबाबत कठोर इशारा दिला. बैठकीत बोलताना आबिटकर म्हणाले की, “अधिकाऱ्यांची बांधिलकी कंत्राटदारांशी नसून जनतेशी आहे. त्यामुळे कामाचा दर्जा तपासूनच बिले अदा करावीत. कामात हलगर्जीपणा आढळला किंवा तक्रार आली […]
