महाराष्ट्रात VinGroup ची ₹७० हजार कोटी गुंतवणूक; स्मार्ट टाऊनशिप व ई-मोबिलिटी प्रकल्पांना चालना
मुंबई — व्हिएतनाममधील विनग्रुप (VinGroup) महाराष्ट्रात सुमारे ८.५ अब्ज अमेरिकन डॉलर (सुमारे ₹७०,००० कोटी) गुंतवणूक करणार असून, यासंदर्भात उद्योग विभाग आणि एमएमआरडीए (MMRDA) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या करार सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पांतर्गत औद्योगिक तसेच शहरी विकासाशी संबंधित विविध घटकांचा समावेश […]
