संस्थापक व मुख्य संपादक (Founder & Editor-in-Chief)
राजकारण (The Rajkaran)
विवेक भावसार हे गेली तीन दशके महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि प्रशासनावर सातत्याने लिखाण करणारे ज्येष्ठ राजकीय पत्रकार आहेत. त्यांनी मुंबईतील मंत्रालय, विधिमंडळ, तसेच राज्यातील विविध प्रशासकीय यंत्रणांच्या कामकाजाचे दीर्घकाळ प्रत्यक्ष वार्तांकन केले आहे.
त्यांनी The Asian Age, Free Press Journal यांसारख्या इंग्रजी दैनिकांबरोबरच लोकमत, सामना यांसारख्या मराठी वृत्तपत्रांतही काम केले आहे. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू म्हणजे राजकीय निर्णयांमागील प्रक्रिया, सत्तेची समीकरणे, धोरणांचे परिणाम आणि सार्वजनिक उत्तरदायित्व.
विवेक भावसार हे Kalpak Digital Media LLP या माध्यम समूहाचे संस्थापक असून, या समूहाअंतर्गत TheNews21.com (इंग्रजी), Maharashtra.city आणि TheRajkaran.com ही डिजिटल माध्यमे कार्यरत आहेत. तपासात्मक, विश्लेषणात्मक आणि पुराव्याधारित पत्रकारिता हा त्यांच्या कार्याचा मुख्य पाया आहे.
राजकीय दबाव, आर्थिक प्रभाव किंवा प्रचारात्मक भूमिकांपासून दूर राहून, वाचकांना स्पष्ट, वस्तुनिष्ठ आणि संदर्भासहित माहिती देणे ही त्यांची संपादकीय भूमिका आहे.