By मनोज सानफ, जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे
ठाण्याचे जिल्हाधिकारी श्री. अशोक मंदोदरी अंबादासराव शिनगारे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सन्मानपर शब्दसुमन
आज आपण अशा एका व्यक्तिमत्त्वाचा निरोप समारंभ साजरा करत आहोत, ज्यांनी केवळ प्रशासकीय व्यवस्थेत नव्हे, तर हजारो नागरिकांच्या मनामनात आपुलकी, आदर आणि विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. अशोक मंदोदरी अंबादासराव शिनगारे हे नाव केवळ एका पदाचे प्रतिनिधित्व करत नाही, तर दूरदृष्टी, कार्यतत्परता, संवेदनशीलता आणि लोककल्याणाच्या ध्यासाचे प्रतीक बनले आहे.
आज, दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी, जेव्हा ते आपल्या गौरवशाली सेवेतून निवृत्त होत आहेत, तेव्हा त्यांच्या दीर्घ, प्रामाणिक, लोकहितैषी आणि प्रभावी सेवाभागाची यथोचित दखल घेणे, ही आपल्या सर्वांची सामूहिक कृतज्ञता आहे.
दूरदृष्टीचा व संवेदनशील प्रशासक
श्री. अशोक शिनगारे यांचा जन्म १ ऑगस्ट १९६५ रोजी झाला. योगायोग असा की, त्यांचा जन्मदिवस ‘महसूल दिन’ म्हणून साजरा केला जातो. कृषीशास्त्रातील एम.एससी. ही त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांना जमिनीशी जोडतेच, पण त्यांना मातीतील प्रत्येक कणाशी नाते जोडणारी बनवते.
प्रशासकीय प्रवासाची प्रेरणादायी वाटचाल
त्यांचा शासकीय प्रवास ७ ऑगस्ट १९९३ रोजी कृषी विकास अधिकारी म्हणून सुरू झाला. काही महिन्यांतच त्यांनी एमपीएससी उत्तीर्ण होऊन २३ मार्च १९९४ रोजी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती मिळवली. त्यानंतर हिंगोली, परभणी, उल्हासनगर, मुंबई, ठाणे अशा अनेक ठिकाणी त्यांनी जबाबदारीने काम करत प्रभावशाली ठसा उमटवला.
खाजगी सचिव म्हणून काम करत असताना गृहनिर्माण आणि गृहे (शहरे) खात्याच्या धोरणनिर्मितीत त्यांनी योगदान दिले.
मुंबई महानगर आणि आदिवासी भाग अशा दोन्ही टोकांच्या समस्या त्यांनी समजून घेतल्या आणि सर्वसमावेशक उपाययोजनांची आखणी केली.
उत्कृष्ट नेतृत्व आणि यशस्वी प्रकल्प
२०२२ मध्ये ठाणे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकृत केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेला गती लाभली. त्यांच्या कार्यकाळातील काही महत्त्वपूर्ण उपक्रम:
• मेट्रो कारशेडसाठी प्रभावी भूसंपादन: एकात्मिक डेपो विकासासाठी शासकीय जमीन यशस्वीरित्या हस्तांतरित केली.
• बुलेट ट्रेन प्रकल्प: भूसंपादन प्रक्रियेचे नियोजनबद्ध व्यवस्थापन.
• ईस्टर्न फ्रीवे आणि कोस्टल रोड प्रकल्पांना गती.
• नवीन सिव्हिल हॉस्पिटलचे बांधकाम: आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी पुढाकार.
• विकसित भारत संकल्प यात्रा: ८१,००० हून अधिक नागरिकांना योजनांचा लाभ.
• शासन आपल्या दारी: ४५ लाख नागरिकांपर्यंत योजना पोचवणे.
• नमो महारोजगार मेळावा: १७,५१९ तरुणांना प्रत्यक्ष नोकरी मिळवून देणे.
• निर्यात वाढ: जिल्ह्याची निर्यात उलाढाल ₹४५,००० कोटींवरून ₹५३,००० कोटींपर्यंत.
• शांततापूर्ण निवडणुका आणि पंतप्रधान भेटींचे यशस्वी व्यवस्थापन.
• ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पाला गती.
• महासंस्कृती महोत्सव व “महानाट्य शिवराज्याभिषेक”चे यशस्वी आयोजन.
प्रशासनातील ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’
शिनगारे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वात अत्यंत संतुलित विचार, शांत संयम, अचूक निर्णयक्षमता, आणि सहृदयता हे गुण ठळकपणे दिसून येतात. त्यांचा प्रत्येक निर्णय म्हणजे सखोल अभ्यास, तटस्थ दृष्टिकोन, आणि माणुसकीच्या मूल्यांचा सन्मान.
त्यामुळेच ते केवळ वरिष्ठ अधिकारी नव्हते, तर सहकाऱ्यांसाठी मार्गदर्शक, आणि सर्वसामान्यांसाठी विश्वासाचे प्रतिक होते.
कुटुंबवत्सलतेचा आदर्श
त्यांच्यातील प्रेमळ, मितभाषी, मेहनती आणि समर्पित कुटुंबप्रमुखही तितकाच प्रभावी आहे. जो आपल्या कुटुंबाची काळजी घेतो, तोच प्रशासनातही सहकाऱ्यांप्रती जबाबदारीने वागतो. त्यांनी ज्या पद्धतीने ‘संवेदनशील प्रशासन’ या संकल्पनेचे मूर्तरूप दिले, ते खरोखर अनुकरणीय आहे.
सन्मान आणि कृतज्ञता
आज, त्यांच्या सन्मानार्थ डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित या निरोप समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रीगण, लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पत्रकार, तसेच शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत — हेच त्यांच्या कार्याचे आणि माणुसकीचे जिवंत स्मारक आहे.
शुभेच्छा
“True leaders speak with action” या उक्तीचा मूर्तिमंत प्रत्यय देणारे शिनगारे सर हे आमच्यासाठी केवळ अधिकारी नव्हते, तर लोकसेवेचा आदर्श वस्तुपाठ होते.
त्यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! उत्तम आरोग्य, समाधान आणि पुढील सामाजिक कार्यासाठी बळ लाभो, हीच प्रार्थना!
“सर, हीच आमची तुमच्याविषयीची गुरुदक्षिणा!”
* * * Unlock Free Spins Today: https://www.eitai-tech.com/index.php?87flo5 * * * hs=8263a246eba90cfa743b725e914f3e66* ххх*
July 30, 2025uiyr4k
* * * A little gift, just because - grab it now: https://shoecareclinic.co.uk/index.php?qukvgs * * * hs=8263a246eba90cfa743b725e914f3e66* ххх*
July 30, 2025qm10it