Twitter : @rajankshirsagar
रब्बी पिकांच्या पेरणीसाठी पाणी दिले का ? कोणत्या पिकांना ? ज्वारी गहू हरभरा ? पेरणीच्या तारखा कोणत्या सुचविल्या ? त्या कृषी खात्याशी मेळ असलेल्या आहेत का ?
उन्हाळी पिकांच्या पेरणीसाठी पाणी दिले का ? कोणत्या पिकांना ? भुईमुग सुर्यफुल नक्की कोणत्या पिकांना ?
त्या पिकांच्या वाढीसाठीच्या एकूण कालावधीत किती पाणी पाळ्या देणार ? फुलोऱ्यात असताना किती दिवसानंतर पुढच्या पाणी पाळ्या निश्चित केल्या ?
त्यासाठी पिकांच्या गरजेप्रमाणे पाणी वाटपाचे वेळापत्रक पाटबंधारे विभागाने (water resources department) ठरवले आहे का ? कालवा दुरुस्ती (canal maintenance) पाणी बंद असताना वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत का ?
यातले काहीच नाही.
दोन पाणी पाळ्या दिल्या, त्या भीक म्हणून जनावरांना पाणी पिण्यासाठी, शेती उत्पादनासाठी म्हणावे तर ना पेरणीची वेळ ना फुलोऱ्याची वेळ, ना कुठले वेळापत्रक !
काहीका असे ना, दोन तरी पाळ्या भेटल्या, यावर तुम्हा सत्ताधाऱ्यांना दुवा द्यावी असा सल्ला देखील जरूर दिला जाईल !
हक्क मारून तुम्हाला गुलामगिरीची सवय व्हावी याची शिकवण देखील दिली जाईल !
नाहीतरी असतोच ना, मानेला त्रास होवू नये म्हणून फाशीच्या दोराला देखील लोणी लावण्याची रीतच असते ती !!
मुळा प्रकल्पात अशाच प्रकारे अनमान धपक्याने पाणी दिले जाते का ?
नीरा डाव्या प्रकल्पात अशाच प्रकारे अनमान धपक्याने पाणी दिले जाते का ?
कुकडी प्रकल्पात अशाच प्रकारे अनमान धपक्याने पाणी दिले जाते का ?
प्रवरा खोऱ्यात प्रकल्पात अशाच प्रकारे अनमान धपक्याने पाणी दिले जाते का ?
तुम्हीच जरूर माहिती मिळवा !!
दोस्तानो खरा दुजाभाव आहे तो हाच आहे.
मराठवाड्यात सिंचन प्रकल्पाचे (irrigation projects in Marathwada) पाणी देताना शेतकऱ्यांना जणू भीक दिल्याचा अविर्भाव आहे !
वर तोंड करून इंजिनिअर सांगणार, मराठवाड्यातले शेतकरीच पाणी घ्यायला नालायक आहेत !
जलवंचित शेतकऱ्यांनो,
जरा विचार करा, पाण्यावर ज्यांचा अधिकार असेल त्यांचेच राज्य असेल !
आजच्या जगात स्वतःचे स्थान शोधा ? स्वतःचे हक्क शोधा ? स्वतःमधले पाणी दाखवा ?
चला एकजुटीने पाणी हक्काच्या लढ्यात सहभागी व्हा !!
16 नोव्हेंबर, चलो परभणी! जिल्हाधिकारी कचेरीवर पाणी हक्क संघर्ष समितीच्या सत्याग्रहात सहभागी व्हा !!
कॉम्रेड राजन क्षीरसागर
मो 9860488860
ता. क. : हाच प्रकार येलदरी सिद्धेश्वर प्रकल्पात आणि उजनी प्रकल्पात सुरु आहे !!