पाकिस्तान डायरी

फसलेला डाव 

X: @therajkaran

इतरांसाठी खोदलेल्या खड्ड्यात आपणच पडणे या म्हणीचा प्रत्यय पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) (Pakistan Muslim League -Nawaz) पक्षाचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांना येतो आहे. पारंपरिक राजकीय विरोधक असलेल्या इम्रान खान (Imran Khan) यांना पुन्हा सत्तेत न येऊ देण्यासाठी नवाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिम मुनीर (Pakistan Army Chief Asim Munir) यांनी आटोकाट प्रयत्न केले. इम्रान यांना विविध खटल्यांमध्ये तुरुंगात डांबण्यात आले. 

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरीक ए इंसाफ (Pakistan Tehreek – e -Insaf – PTI) या पक्षाचे चिन्ह, क्रिकेट बॅट गोठवून टाकले. इम्रान यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले. हे सगळे करण्यामागे एकच उद्देश होता इम्रान यांचे राजकीय अस्तित्व संपवणे. मात्र, नियतीचा डाव असा उलटला आहे की इम्रान यांचा पक्ष संपला तर नाहीच उलट आठ फेब्रुवारीला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला आहे. 

अर्थात, पक्षाच्या चिन्हावर त्यांचे उमेदवार लढले नाहीत. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. याच अपक्ष खासदारांची (Members Of Parliament) संख्या सर्वांत जास्त ठरली आहे. ते सगळेच्या सगळे इम्रान खान यांचे समर्थक आहेत. नवाज शरीफ यांचा पक्ष दुसऱ्या स्थानावर, तर बिलावल भुट्टो-झरदारी (Bilawal Bhutto Zardari) यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी (Pakistan Peoples Party -PPP) तिसऱ्या स्थानावर आहेत. 

नॅशनल असेंब्लीच्या 265 जागांसाठी मतदान (election for National Assembly) झाले होते. पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी 133 जागांची गरज आहे. ती गरज आता कोणताही एक पक्ष स्वतःच्या बळावर पूर्ण करू शकत नाही. पाकिस्तानमध्ये आघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. राजकीय स्थैर्यासाठी (political stability) आघाडी सरकार स्थापन करावे, असे आवाहन लष्करप्रमुख आसिफ मुनीर यांनी केले आहे. त्यातून लष्कराच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज येतो. नवाज शरीफ यांनीदेखील पीपीपीसोबत आघाडी सरकार स्थापन करण्याची तयारी दाखवली आहे. तर इम्रान खान यांना अजूनही पीटीआयचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास वाटतो आहे. 

pakistani diary

या सगळ्या परिस्थितीत बिलावल भुट्टो-झरदारी यांची पीपीपी किंगमेकर ठरणार आहे. नवाज शरीफ यांनी आघाडी सरकार स्थापन करण्याची तयारी उतावळेपणाने दाखवली. आमच्यात अजून काहीही ठरलेले नाही, असे बिलावल यांनी स्पष्ट केले आहे. स्वाभाविकपणे, सत्तेचा अधिक वाटा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करताना बिलावल दिसत आहेत.

या सगळ्या परिस्थितीत पुढील शक्यता जाणकारांना वाटतात. 

1. नवाज शरीफ आणि बिलावल भुट्टो-झरदारी यांचे संयुक्त सरकार केंद्रात स्थापन होईल. त्यात नवाज यांचे धाकटे बंधू शहाबाज शरीफ (Shehabaz Sharif) पंतप्रधान असतील. या बदल्यात बिलावल भुट्टो-झरदारी यांचे वडील आसिफ अली झरदारी (Asif Ali Zardari) यांना राष्ट्रपती केले जाईल. 

2. या आघाडी सरकारमध्ये बिलावल भुट्टो-झरदारी पंतप्रधान होतील आणि शहाबाज शरीफ यांना राष्ट्रपती केले जाईल. 

3. निवडून आलेल्या अपक्ष खासदारांची तोडफोड करून नवाज शरीफ लष्कराच्या मदतीने पंतप्रधान होतील. 

4. नवाज शरीफ यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इम्रान खान यांचे समर्थक अपक्ष खासदार बिलावल भुट्टो-झरदारी यांना पंतप्रधान म्हणून पाठिंबा देतील. 

पाकिस्तानातील राजकीय परिस्थिती अत्यंत रंजक वळणावर आहे. नवाज शरीफ यांना पंतप्रधान होता आले नाही तर त्यांनी आतापर्यंत घडवलेल्या सर्व कारवाया व्यर्थ ठरतील. नवाज शरीफ किंवा शहाबाज शरीफ पंतप्रधान झाले नाहीत, तर लष्कर पुन्हा प्रबळ होईल आणि राजकीय संघर्ष आणखी टोकदार होईल हे मात्र निश्चित आहे.

Also Read: इम्रान खान आऊट

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

ताज्या बातम्या पाकिस्तान डायरी

इम्रान खान, गोपनीय कागद आणि शह – काटशह

X: @therajkaran इम्रान खान पाकिस्तानचे सर्वोत्तम क्रिकेटपटू होते. वेगवान गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. नव्या चेंडूबरोबरच ते
पाकिस्तान डायरी

ते परत आले आहेत

X: @therajkaran नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या राजकारणातील बडे प्रस्थ आहेत. तीन वेळा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी त्यांना मिळाली आणि तिन्ही