राजकारण का?

राजकारणात रस नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. राजकारण आवडत नाही अशी व्यक्ती देखील विरोधात का असेना पण राजकारणावर भरभरून बोलत असते. गाव - खेड्यात तर पारावर बसून देश कसा चालवायचा, राज्य कारभार कसा हाकायचा, याचे ज्ञान देणारे असंख्य ग्रामस्थ जागोजागी आढळून येतात. थोडक्यात काय तर आपल्याला आवडो वा नावडो, राजकारण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.

महाराष्ट्रापुरता बोलायचे झाले तर गेल्या चार वर्षात राज्यातील राजकारणात इतकी उलथापालथ झाली आहे की त्याचा कोणी विचारही केला नसावा. भविष्यात काय वाढून ठेवले आहे, याचादेखील अंदाज बांधणे कठीण आहे. मात्र, प्रत्येक घडामोडीमागे एक राजकारण लपलेले असते. पडद्यामागे बरंच काही घडत असतं. ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतात, असे अर्थ शोधून, अशा घटनांचा आढावा घेणारे, त्याचे विश्लेषण करणारे पोर्टल म्हणजे राजकारण.

राजकारण मध्ये केवळ बातम्या नसतील तर बातम्यांचे सखोल विश्लेषण असेल, लेख असतील, आणि वाचकांना व्यक्त होण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र स्तंभ देखील असेल. तर वाचक हो सामील व्हा, व्यक्त व्हा, राजकारण समजून घेऊया.