पाकिस्तान डायरी

ते परत आले आहेत

X: @therajkaran

नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या राजकारणातील बडे प्रस्थ आहेत. तीन वेळा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी त्यांना मिळाली आणि तिन्ही वेळा ते कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. कधी बंडामुळे, तर कधी भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. जगभरात गाजलेल्या पनामा पेपर्स (Panama papers) प्रकरणात नाव आल्यामुळे 2017 मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of Pakistan) शरीफ यांना दोषी ठरवले. त्यामुळे त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. त्यानंतर अटक टाळण्यासाठी ते लंडनला (London) पळून गेले. 

नवाज शरीफ (Nawaz Sharif) आता चार वर्षानंतर पाकिस्तानात (Pakistan) परत आले आहेत. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शरीफ यांचे कट्टर शत्रू, माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) सध्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. शरीफ यांना शिक्षा ठोठावणारे न्यायमूर्ती आसिफ खोसा निवृत्त झाले आहेत. पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआय (ISI) आता शरीफ यांच्या विरोधात नाहीत. त्यातच इस्लामाबाद उच्च न्यायालयाने (Islamabad High Court) शरीफ यांच्याविरुद्धचा भ्रष्टाचाराचा गुन्हा रद्दबातल ठरवला आहे. त्यामुळे तर शरीफ यांना हत्तीचे बळ आले आहे. 

गेली चार वर्षे जवळपास विजनवासात असलेले शरीफ आता बोलू लागले आहेत. “मला सत्तेतून घालवण्यासाठी तत्कालीन सरन्यायाधीश आसिफ खोसा यांनी इम्रान खान यांच्या मदतीने कट केला होता,” असा सनसनाटी आरोप शरीफ यांनी आपल्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) (Pakistan Muslim League) या पक्षाच्या कार्यकर्त्यांपुढे बोलताना केला. शरीफ कधीही इम्रान खान यांचे नाव घेत नाहीत. ते खान यांना लाडला असे संबोधतात. लाडला याला सत्तेत बसवण्यासाठी सगळेजण आपल्या विरोधात एकवटले होते. स्वतःच्या मुलाकडून पगार घेतला नाही म्हणून आपण भ्रष्ट ठरतो असा हास्यास्पद आरोप आपल्यावर लावण्यात आला, असा प्रचार त्यांनी सुरू केला आहे. आपण सत्तेत होतो तेव्हा पाकिस्तानात बारा हजार मेगा मेगावाट अतिरिक्त विजेचे उत्पादन झाले होते. मग आता पाकिस्तान काळोखात (power shortage in Pakistan) का बुडाला आहे, असा सवाल ते करतात. 

कारगिलचे युद्ध (Kargil War) नवाज शरीफ कधीही विसरू शकणार नाहीत. ते पंतप्रधान असताना 1999 मध्ये लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ (Parvez Musharraf) यांच्या आदेशाप्रमाणे पाकिस्तानी सैन्य कारगिलमध्ये घुसले होते. भारतीय सैन्याने (Indian Army) त्यांना तिथून हूसकावून लावले आणि पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली. कारगिलमध्ये घुसखोरी करण्याचा निर्णय मुशर्रफ यांनी आपल्याला न विचारता घेतला होता, असा दावा शरीफ सातत्याने करत असतात. या दाव्याचा पुनरुच्चार त्यांनी नुकताच केला. पाकिस्तान मध्ये 8 फेब्रुवारी 2024 या दिवशी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भारताची सहानुभूती आपल्या बाजूने असावी, असा शरीफ यांचा प्रयत्न आहे. कारगिल युद्धासंदर्भातील त्यांचे विधान हा या प्रयत्नांचा एक भाग आहे. 

निवडणूक पडघम

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी रात्री मोठे नाट्य पाहायला मिळाले. न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर सरन्यायाधीश काझी फैज इसा यांनी एक तातडीची सुनावणी घेतली. त्यात लाहोरच्या उच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेला दिलेली स्थगिती उठवण्यात आली. आता निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीवरील स्थगिती उठविण्याचा काही तास आधीच पाकिस्तान सरकारने पेट्रोलचे दर 14 रुपयांनी कमी केले. आता पेट्रोल 267 रुपये लिटर आणि डिझेल 278 रुपये लिटर या दराने मिळणार आहे.

Also Read: इम्रान खान, गोपनीय कागद आणि शह – काटशह

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

ताज्या बातम्या पाकिस्तान डायरी

इम्रान खान, गोपनीय कागद आणि शह – काटशह

X: @therajkaran इम्रान खान पाकिस्तानचे सर्वोत्तम क्रिकेटपटू होते. वेगवान गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. नव्या चेंडूबरोबरच ते
pakistani diary
पाकिस्तान डायरी

पुन्हा एकदा बांगलादेश… 

Pakistan Diary  X: @Therajkaran सुमारे 52 वर्षांपूर्वी तत्कालीन पूर्व पाकिस्तानात घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती आज बलुचिस्तानमध्ये होते आहे. पाकिस्तानातील सर्वांत मोठा