Sports

मुंबई मराठी पत्रकार संघाचे क्रीडा पुरस्कार जाहीर : द्वारकानाथ संझगिरी यांना मरणोत्तर सन्मान

मुंबई : क्रीडा पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिले जाणारे ‘महेश बोभाटे स्मृती क्रीडा पुरस्कार’ आणि ‘आत्माराम मोरे स्मृती क्रीडा पुरस्कार’ मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर करण्यात आले आहेत. २०२० ते २०२४ या कालावधीतील पाच वर्षांचे पुरस्कार यंदा एकत्रितपणे देण्यात येणार आहेत.

ज्येष्ठ पत्रकारांसाठी दिला जाणारा ‘महेश बोभाटे स्मृती क्रीडा पुरस्कार’ यंदा सुप्रसिद्ध क्रीडा समीक्षक दिवंगत द्वारकानाथ संझगिरी यांना मरणोत्तर जाहीर झाला आहे. तसेच महाराष्ट्र टाइम्सचे निवृत्त पत्रकार शरद कद्रेकर, संजय परब, एबीपी माझाचे विजय साळवी आणि दै. पुण्यनगरीचे सुभाष हरचेकर यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि रोख रु. १०,०००/- इतके आहे.

युवा पत्रकारांसाठी दिला जाणारा ‘आत्माराम मोरे स्मृती क्रीडा पुरस्कार’ अनुक्रमे दै. सामनाचे मंगेश वरवडेकर, नवशक्तीचे तुषार वैती, लोकमत डिजिटलचे प्रसाद लाड, दै. सकाळचे जयेंद्र लोंढे आणि दै. लोकमतचे रोहित नाईक यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि रोख रु. ७,०००/- इतके आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, १९ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडणार आहे. पद्मश्री हॉकीपटू आणि भारताचे माजी कर्णधार धनराज पिल्ले, ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, आणि महाराष्ट्राचे पहिले मिस्टर इंडिया विजू पेणकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील.

“कोविड काळ आणि त्यानंतरच्या काही कारणांमुळे पुरस्कार वितरण रखडले होते. यंदा मात्र पारदर्शक निवड प्रक्रियेद्वारे या मान्यवर क्रीडा पत्रकारांची निवड करण्यात आली आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावर या पत्रकारांनी दिलेले योगदान गौरवास्पद आहे,” असे पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

Sports ताज्या बातम्या

मॉडर्न आणि अंजुमन इस्लाम यांच्यात हॅरिस शिल्डची जेतेपदासाठी झुंज

थरारक विजयासह पार केला उपांत्य फेरीचा अडथळा मुंबई : शालेय क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेच्या हॅरिस शिल्ड
Sports ताज्या बातम्या

कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी स्पर्धेत श्री स्वामी समर्थचा थरारक विजय

पाच-पाच चढायांच्या संघर्षात अमर हिंदवर मात मुंबई – शेवटच्या चढाईपर्यंत हृदयाचे ठोके चुकवणार्‍या सामन्यात श्री स्वामी समर्थ संघाने पाच-पाच चढायांच्या