महाड–मंडणगड मार्गावरील उघडी विहीर धोकादायक; सुरक्षा जाळी कधी बसणार?
महामार्ग वाहतूक शाखेकडून वारंवार पत्रव्यवहार झाल्याचा दावा; मोठी दुर्घटना होण्यापूर्वी उपाययोजना करण्याची प्रवाशांची मागणी महाड : महाड–मंडणगड मार्गावरील तेलंगे मोहल्ला परिसरात रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीवर अद्याप सुरक्षा जाळी अथवा मजबूत संरक्षक व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या विहिरीवर तातडीने सुरक्षा जाळी बसवण्याबाबत महामार्ग वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, […]
