विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आरटीओतील कथित वसुली रॅकेटचा मुद्दा उपस्थित केला महाराष्ट्र ताज्या बातम्या

आरटीओतील कथित ‘वसुली साम्राज्या’चा विधानसभेत स्फोट; एसआयटी चौकशीची घोषणा

वडेट्टीवारांच्या कथित ऑडिओ क्लिप्सनंतर सरकारची तातडीची कारवाई; महिनाभरात अहवाल मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच गाजला. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आरटीओ विभागात अनेक वर्षांपासून संघटित स्वरूपात कथित ‘वसुली रॅकेट’ सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. यासंदर्भात काही अधिकाऱ्यांच्या संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिप्सही त्यांनी सभागृहात सादर केल्याने […]

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब विधान परिषदेत नाशिक सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांच्या निविदांबाबत चर्चा करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निविदांवरून विधान परिषदेत जोरदार आरोप-प्रत्यारोप; अनिल परबांची एसआयटी चौकशीची मागणी

‘देवाला तरी सोडा…’ म्हणत सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप; प्रत्येक आरोपाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू – मंत्री शिवेंद्रराजे भोसले मुंबई: २०२७ च्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या विकासकामांवरील निविदा प्रक्रियेवरून शुक्रवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी सरकारवर निविदा प्रक्रियेत कथित अनियमिततेचे गंभीर आरोप करत संपूर्ण […]