मुरबाड आश्रमशाळा विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरणी प्रकल्प अधिकारी निलंबित : मंत्री अशोक उईके
मुंबई: ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथील शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आश्रमशाळेत शिकणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या प्रकरणात प्रकल्प अधिकारी हिवाळे यांना निलंबित करण्यात येणार, अशी घोषणा आदिवासी विकासमंत्री Ashok Uikey यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. या संदर्भात भाजप सदस्य Sanjay Kelkar यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. आमदार Kisan Kathore यांनीही या प्रकरणात संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली […]
