द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना युद्धजन्य परिस्थितीत विशेष अनुदान देणार का? जयंतराव पाटील यांचा सरकारला सवाल
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी आज विधानसभेत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केला. लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून त्यांनी युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीवर झालेल्या परिणामांकडे सरकारचे लक्ष वेधले. जयंतराव पाटील म्हणाले की, अफगाणिस्तानमार्गे येणाऱ्या मालावर बंदी घालण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी सात–आठ महिन्यांपूर्वी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी पत्रव्यवहार केला […]
