Budget Session: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार रुपयांच्या मदतीवर लवकर निर्णय; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक : योगेश कदम
मुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संबंधितांची बैठक घेण्यात येईल. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर उचित निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट आणि नि:संदिग्ध उत्तर अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री Yogesh Kadam यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिले. भाजपचे ज्येष्ठ सदस्य Sudhir Mungantiwar यांनी पूर्व विदर्भातील धान उत्पादकांना बोनस […]
