विकासकामांवरून मराठवाड्यात श्रेयवादाची राजकीय लढाई
मार्चअखेर निधी नियोजन आणि निधीवाटपाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध विकासकामांना गती दिली जात आहे. मराठवाड्यातही अनेक प्रकल्पांच्या घोषणा आणि कामांच्या पूर्ततेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी राजकीय पातळीवर मात्र श्रेयवादाची लढाई रंगताना दिसत आहे. सत्ताधारी भाजप, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटासह काँग्रेसचे नेतेही विविध प्रकल्पांचे श्रेय घेण्याच्या स्पर्धेत उतरल्याने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण […]
