₹7.69 लाख कोटींचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प; ‘सामाजिक समता वर्ष’, गाडगेबाबा सर्किट आणि स्मारक प्रकल्पांची घोषणा
मुंबई: प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासनाच्या सूत्रांवर आधारित संतुलित विकासाला चालना देणारा ₹7 लाख 69 हजार 467 कोटींच्या तरतुदीचा 2026-27 चा अर्थसंकल्प मुख्यमंत्री व अर्थमंत्री Devendra Fadnavis यांनी आज विधानसभेत सादर केला. विधानपरिषदेत हा अर्थसंकल्प अर्थराज्यमंत्री Ashish Jaiswal यांनी मांडला. या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न ₹6 लाख 16 हजार 99 कोटी आणि महसुली खर्च ₹6 लाख 56 हजार 651 कोटी इतका अंदाजित असून ₹40 हजार 552 कोटींची […]
