नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांच्या विक्रीचा मुद्दा विधानसभेत; चित्रा वाघ यांचे सरकारला प्रश्न
मुंबई : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांच्या बेकायदेशीर विक्रीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांनी या प्रकरणी सरकारला काही महत्त्वाचे प्रश्न विचारले. पुणे खडकपाडा पोलिसांनी समीर हमीद शेख आणि सुनील गजानन शर्मा या दोघांना अटक केली असून, त्यांच्या कोंढवा येथील घरावर टाकलेल्या छाप्यात मनोरुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे ६९०० औषधी गोळ्या जप्त करण्यात आल्या. […]
