रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ चिंध्यांनी बांधलेले बॅरिकेटर; राज ठाकरेंच्या भेटीआधीच झाली दुरुस्ती
महाड – किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळील लाकडी बॅरिकेटर तुटून त्याला कापडी चिंध्यांनी बांधल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रायगड भेटीपूर्वीच संबंधित बॅरिकेटरची तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळ सुरक्षेच्या दृष्टीने लाकडी बॅरिकेटर उभारण्यात आले आहेत. मात्र या बॅरिकेटरला […]

