नाशिक रिंगरोड भूसंपादनाची चौकशी; विजय वडेट्टीवारांच्या आरोपांनंतर सरकारकडून १५ दिवसांत अहवालाचे आदेश
मुंबई : आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या रिंगरोड प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेवर गुरुवारी विधानसभेत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रकल्पाच्या मार्गिकेत कथित बदल करून विशिष्ट व्यक्ती आणि कंपन्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. वडेट्टीवार यांनी सभागृहात सांगितले की, प्रारंभीच्या आराखड्यात नसलेले काही सर्व्हे क्रमांक नंतर समाविष्ट […]
