कशेडी घाटात खैर लाकडांची तस्करी उघड; वन विभागाने पिकअपसह दोन आरोपींना पकडले
महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूरजवळील कशेडी घाटात खैर लाकडांची वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. या कारवाईत अंदाजे १ लाख रुपयांची खैर लाकडे आणि सुमारे ९ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास कशेडी घाटातील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर एमएच-०८-६७९४ क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे पिकअप […]
