वृक्षतोड परवानगी प्रक्रिया सुलभ; नियमभंग व गैरप्रकारांवर कठोर कारवाईचा सरकारचा इशारा
मुंबई : राज्यातील वृक्षतोड परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ करताना नियमभंग, दलाली किंवा कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी विधानसभेत दिला. विकासकामांना गती देतानाच पर्यावरण संरक्षणालाही तितकेच प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आमदार संतोष दानवे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नाईक यांनी सांगितले की, वृक्षतोड परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या ११ वरून ५ करण्यात आली आहे. तसेच शासकीय […]
