सभागृहाची भाषा बदलली की लोकशाहीचाही चेहरा बदलतो
मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून महाराष्ट्र विधानसभेच्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात झालेला संघर्ष हा केवळ एका प्रकल्पापुरता मर्यादित नव्हता; तो राज्याच्या राजकीय संस्कृतीचा आरसा ठरला. हजारो कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या खर्च, गुणवत्ते आणि सुरक्षिततेबाबत विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सरकारने हे आरोप फेटाळून विरोधकांवर दिशाभूल केल्याचा आरोप केला. मात्र या वादातून सर्वाधिक चर्चेत राहिली ती सभागृहातील भाषा. […]
