Marathwada: मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद : विकासाला नवे रुळ
यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प मराठवाड्यासाठी दिलासादायक ठरला आहे. मराठवाड्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली असून, त्यामुळे या विभागाच्या विकासाला गती मिळणार आहे. अहमदनगर–बीड–परळी, जालना–जळगाव आणि नांदेड–वर्धा या तीन महत्त्वाच्या रेल्वेमार्गांचा या तरतुदीत समावेश आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी हे रेल्वेमार्ग पूर्ण होणे अत्यंत आवश्यक होते. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकल्प […]
