कॅग अहवालातील निरीक्षणांवरून हाफकिनचा मुद्दा विधानसभेत; जयंत पाटील यांची ॲक्शन टेकन रिपोर्टची मागणी
मुंबई : हाफकिन बायो-फार्मास्युटिकल महामंडळातील कथित आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततांचा मुद्दा गुरुवारी विधानसभेत चर्चेचा विषय ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) अहवालातील निरीक्षणांचा संदर्भ देत सरकारकडे स्पष्टीकरण आणि कारवाईची मागणी केली. जयंत पाटील यांनी सभागृहात दावा केला की, पोलिओ लसींच्या वाहतुकीबाबत विमान वाहतुकीची बिले सादर करण्यात आली, मात्र […]
