राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सव २०२६ मुंबईत उत्साहात संपन्न
मुंबई : राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सव २०२६ (National Students’ Film Festival – NSFF 2026) हा दोन दिवसीय महोत्सव २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी मुंबई विद्यापीठ, कलिना येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला. राष्ट्रीय कला मंच (RKM), अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि विद्यार्थी निधी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. […]
