दक्षिण मुंबईतील वारंवार वीज खंडित होण्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर संतप्त; ‘प्रश्न सुटला नाही तर बेस्ट महाव्यवस्थापकांना सभागृहात बोलावू’
मुंबई: दक्षिण मुंबईसह बेस्ट उपक्रमाच्या कार्यक्षेत्रात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला. या प्रश्नावर तोडगा निघाला नाही, तर बेस्टचे महाव्यवस्थापकांना थेट विधानसभेत बोलावून जाब विचारला जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर झालेल्या चर्चेदरम्यान अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की, बुधवारी आपल्या दालनात बेस्ट […]
