सचिन अहिर शिंदे गटात; अपात्रतेच्या मुद्द्यावर नवा कायदेशीर वाद पेटण्याची शक्यता
शिंदे गटाचा दावा – ‘हा पक्षांतराचा विषयच नाही’; ठाकरे गटाकडून कायदेशीर आव्हानाची शक्यता मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मंगळवारी महत्त्वाची घडामोड घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना विधान परिषद उपसभापतीपदासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या […]
