पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते आर्थिक विकास महामंडळ पुढील अधिवेशनाच्या आत – आशिष शेलार
मुंबई: पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर करण्यात आलेले आर्थिक विकास महामंडळ पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन केले जाईल, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली. तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पत्रकार संघटना, शासनातील विविध विभाग आणि लोकप्रतिनिधी यांची लवकरच व्यापक बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. विधान परिषदेत आमदार श्रीकांत भारतीय यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करून पत्रकार […]
