Bank strike: २७ जानेवारीला देशव्यापी बँक संप; पाच दिवसांच्या आठवड्याच्या मागणीसाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन
मुंबई: पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी देशभरातील बँक कर्मचारी व अधिकारी २७ जानेवारी रोजी देशव्यापी संपावर जाणार असल्याची घोषणा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) च्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज मुंबईतील आझाद मैदानात सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात २०० हून अधिक […]
