महाराष्ट्र ताज्या बातम्या

Election Day: मुंबई मनपातील वाढत्या मतदानामुळे भाजपमध्ये धडकी?

हिंदी प्रसार माध्यमांतून खोटे नॅरेटिव्ह पसरवण्याचा आरोप मुंबई: तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत गुरुवारी झालेल्या मतदानाला मराठी मतदारांसह अल्पसंख्यांक, तरुण-तरुणी आणि महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांमध्ये धडकी भरल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंच्या आवाहनाला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने भाजपची चिंता वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC election : “स्वप्नांचे व्यापारी” मुख्यमंत्री; चार वर्षांत काय केलं?; जाहीरनाम्याची आठवण करून देत सचिन सावंत यांचा घणाघात

मुंबई : मुख्यमंत्री स्वतःला “स्वप्नांचे सौदागर” म्हणवून घेत असले तरी, प्रत्यक्षात महाराष्ट्राचं वर्तमान किती काळोख आहे, याचं उत्तर ते देत नाहीत, असा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या सलग दोन ट्वीट्समध्ये सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी थेट सवाल उपस्थित करत म्हटलं आहे की, […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC Elections : भाजपला पराभव दिसू लागल्याने प्रचारसभांमध्ये अश्लील नृत्यांचा आधार?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा आरोप, व्हिडीओ व्हायरल मुंबई – “यंदाची मुंबई महानगरपालिका भाजपच जिंकणार” अशा दर्पोक्ती करणाऱ्या भाजप नेत्यांना आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या भक्कम युतीमुळे आपला पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळेच भाजपने मुंबईतील प्रचारसभांमध्ये बिहार व उत्तर प्रदेशातून आणलेल्या गायिकांच्या अश्लील नृत्यांचा आधार घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आखिल […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC Elections : बिनविरोध निवडणुकांमागे मनमानी निर्णयप्रक्रिया आणि अपारदर्शक व्यवस्था कारणीभूत? – निलेश चव्हाण

ठाणे: राज्यात मोठ्या संख्येने झालेल्या बिनविरोध नगरसेवक निवडींकडे केवळ कार्यकर्त्यांच्या दोषांमधून पाहणे चुकीचे ठरेल, असा ठाम मतप्रवाह सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक निलेश चव्हाण (ठाणे) यांनी व्यक्त केला आहे. बिनविरोध निवडणुका का आणि कशामुळे झाल्या, याचा शांतपणे आणि सखोल विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. चव्हाण यांच्या मते, कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता विविध राजकीय पक्षांचे […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC Elections : मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेची अवस्था ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’!

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे भाजपसोबत सन्मानजनक जागावाटप झाले असले, तरी प्रत्यक्ष मैदानात शिंदेंच्या शिवसेनेची अवस्था मुंबईत ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ अशी झाल्याचे चित्र समोर आले आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे कुलाब्यातील वॉर्ड क्रमांक २२५. जागावाटपात हा वॉर्ड भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर भाजपने राहुल नार्वेकर यांच्या नातेवाईक हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC elections : असा असेल मुंबई महापालिकेचा निकाल; भाजप शंभरीकडे, शिंदे सेनेला अर्धशतक अवघड?

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीची (BMC Elections) प्रक्रिया सुरू झाली असली, तरी कोणते पक्ष कोणत्या युतीत असतील आणि कोण किती जागा लढवणार, याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सरकारी पातळीवरील अंतर्गत अहवालानुसार भारतीय जनता पक्ष (BJP) यावेळी शंभरी पार करण्याच्या स्थितीत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याउलट शिवसेना (एकनाथ शिंदे गट) (Shiv Sena) यांना ५० […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC Elections: भांडुप ११४: मनसेच्या अनिशा माजगावकर कोणाकडून लढणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?

मुंबई: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची (Uddhav – Raj alliance) घोषणा झाल्यानंतर मुंबई महापालिकेतील (BMC elections) जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. मात्र भांडुप विधानसभा Bhandup Assembly constituency) मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११४वरून अद्याप स्पष्ट तोडगा निघालेला नसल्याने, युतीतील पहिला मोठा पेच याच प्रभागात निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या अनिशा माजगावकर (MNS Leader […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC Elections :  मुंबईत काँग्रेससमोर उमेदवारांचा तुटवडा, ३० हून अधिक प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही

X: @vivekbhavsar मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (BMC elections) नामांकन प्रक्रिया सुरू झाली असली, तरी सुरुवातीलाच समोर आलेल्या अंतर्गत आकडेवारीमुळे मुंबईतील काँग्रेसच्या (Mumbai Congress) संघटनात्मक क्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. TheRajkaran (राजकारण) ला मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अनेक विधानसभा क्षेत्रांमध्ये (Assembly segment) काँग्रेसकडे अद्याप एकही इच्छुक उमेदवार पुढे आलेला नाही आणि काही ठिकाणी उमेदवारांचा शोध अजूनही सुरू […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Uddhav – Raj alliance : अखेर ठरले! महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र; सोबतीला कोणते ‘पवार’?

मुंबई: मुंबईसह राज्यातील सर्वच २९ महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रित लढण्यावर अखेर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये (Thackeray’s alliance) एकमत झाले आहे. अनेक दिवसांच्या राजकीय चर्चेनंतर, “घोडे गंगेत न्हाले” अशी स्थिती निर्माण झाली असून, या निर्णयाची अधिकृत घोषणा बुधवारी दुपारी १२ वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात करण्यात येणार आहे. या घोषणावेळी उद्धव ठाकरे (Udahav Thackeray) यांच्या शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mumbai Politics: “उद्धव ठाकरेंसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका

मुंबई: गेल्या पंचवीस वर्षांत सत्तेत असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी मुंबई (Mumbai) ही “सोन्याची अंडी देणारी कोंबडी” होती, अशी घणाघाती टीका करत, कोविड काळातील खिचडी घोटाळा, बनावट कोविड सेंटर आणि बॉडीबॅग घोटाळ्यांचे आरोप असलेल्यांनी टोमणे मारण्याऐवजी आधी स्वतःकडे पाहावे, असा सणसणीत टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी लगावला. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर […]