Nagpur Session : आंबा, संत्रा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा योजनेची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढ
नागपूर: राज्यातील आंबा, संत्रा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत (RWBCIS) वेळेत सहभाग घेता न आल्याने, या योजनेची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी दिली. कृषीमंत्री भरणे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या नोंदणी आणि पडताळणी प्रक्रियेत उशीर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना विमा योजनेत सामील होता आले […]
